अशी सजशील गं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 16, 2020, 06:35:46 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.अशी सजशील गं*

अशी सजशील गं माझी होशील गं
प्रेमात पाडून तू काळीज चोरून नेशील गं

माझ्या दिलाची गं आहे राणी तू गं
तुला पाहून काळजाचं होतं पाणी पाणी गं

अगं तुला शोधून थकलो राणी वनी गं
तुझ्याशिवाय वेड्याला नाही वाली कोणी गं

अशी आली अवकळा झाली अनहोनी गं
मग लॉकडाऊन वाढलं अडकलो दोन्ही गं

तुला व्हिडीओ कॉल केला होता काल गं
तू दिसलीच नाही झाले लई माझे हाल गं

अशी घरात राहून तू लई होशील गोरी गं
पण कधी विसरू नको तू मला पोरी गं

मी प्रेम केलं आहे नाही केली चोरी गं
मी तुला मिठीत घेईल पुन्हा बोलून सॉरी गं

✍🏻(कविराज.अमोल शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर