खेळ प्रेमाचा

Started by Ashpak Talikote, August 23, 2020, 10:56:40 AM

Previous topic - Next topic

Ashpak Talikote

ह्रदयाच्या या खेळात तु हारू नकोस
तुटल एक खेळन म्हणुन रडत बसु नकोस

प्रकाश दिला प्रेमाचा जाळलो स्वत:ला
एक दिवा विझला म्हणुन आयुष्यात अंधार करून बसु नकोस.

स्वत:ला दोषी ठरवेन मी कवितेत माझ्या
तु जाब कोणाला देत बसु नकोस.

मनात असतं तर दुर गेली नसती
नशीबात असेल तर भेटु म्हणु नकोस.

सोडली होती जिथे..वाट पाहीन मी तिथे..
आयुष्य भर तुझा राहील
विसरेन तुला समजु नकोस.

          - ©अशपाक तालीकोटे