माझ्या प्रेमाला मला देणार का ?

Started by Ashpak Talikote, August 23, 2020, 11:09:14 AM

Previous topic - Next topic

Ashpak Talikote

माझ्या प्रेमाला मला देताल का ?
विसकटलेल्या प्रेमाच्या मोत्याला बंधन नात्याच बांधताल का ?
तडपणार्या या ह्रदयाला त्याच्या धडकनाशी मिळवताल का ?
माझ्या प्रेमाला मला देताल का ?

आईची माया आईच प्रेम नाही देऊ शकणार कधी तिला पण माझ्या या प्रेमाच्या महालात खुप खुष ठेवेन तिला ,
चमकणार्या तिच्या डोळ्यात एकदाच मला पाहताल का ?
माझ्या प्रेमाला मला देताल का ?

डोळ्यातुन पडलेल्या तिच्या त्या थेंबाना पुसण्याचा हक्क मला देताल का ?
अवतीभवती नेहमीच पाहीलात असतिल तिच्या मला,
तिच्या ह्रदयावर हात ठेवुन माझा सहवास ओळखताल का ?
सगळी बंधन वेगळी करुन फक्त आई म्हणुन निर्णय घेताल का ?
माझ्या प्रेमाला मला देताल का ?

तिच्या प्रेमात मि रोज तडपतो ,रोज देवासमोर भिक मागतो ,
एकमेकाविना जगु नाही शकणार ,आमच्या प्रेमासोबत आम्हाला जगु देताल का ?
हात पसरवुन मागतो ,आमच्या प्रेमाची झोळी भरताल का?
माझ्या प्रेमाचा हात मला देताल का ?

लेखन - ©अशपाक तालीकोटे