बालपण हे सुखाच्या चौकटीत होतं.

Started by Ashpak Talikote, August 23, 2020, 11:14:25 AM

Previous topic - Next topic

Ashpak Talikote

बालपण हे सुखाच्या चौकटीत होतं..

मायेच्या प्रेमाचा डोक्यावर हाथ होत
घरात नांदणारा तो आईसाठी क्रष्ण बाळ होतं
केलेल्या प्रत्येक हट्टी चा तीथ समाधान होतं
वळुन पाहील तर कळालं
बालपण हे सुखाच्या चौकटीत होतं.

तुटलेली खेळणी होती पण जुळालेल नात होतं
डोळ्यातुन अश्रु लाख पडले तरी पुसणार आईच हात होतं
उंची छोटी असली तरी आजोबाच्या खांद्यावर सार आभाळ छोटं होतं
वडीलांच हाथ पकडुन चालताना माझ्यासाठी ते आधार होतं
आठवतं सगळं "बालपण हे सुखाच्या चौकटीत होतं".

केलेल्या चुका ,केलेली मस्ती तीथ सगळे गुन्हा माफ होतं.
आईच्या मिठीत गेलं की सार जग छोटं होतं
ना मागता सगळं मिळायच तिथं कसला सर्वार्थच नव्हतं
लहानपणाची चौकट ओलांडून
जगाच्या अंगणात येऊन कळालं
बालपण हे सुखाच्या चौकटीत होतं.
                 
           लेखन - ©अशपाक तालीकोटे