अबोल वाट

Started by शिवाजी सांगळे, August 25, 2020, 02:53:14 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अबोल वाट

अबोल वाट सहज बोलती होते
वाटेवर जेव्हा...तुझी साथ होते

बहरतात फुले...डोलतात झाडे
वाऱ्याचेही मग..तरल गीत होते

जादुई स्पर्शाने तुज पावलांच्या
मृदा वाटेवरली बघ गंधित होते

चाले खेळ पुढे..ऊन सावलीचा
पाहण्या चोरून..ते बहाणे होते

हाती धरूनी हात मुक चालता
मन मनीचे परस्पर..गुज ऐकते

©शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९