प्रथम तुज पाहता

Started by Shubhangi Gaikwad, August 27, 2020, 02:03:55 AM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

प्रथम तुज पाहता

प्रथम तुज पाहता न उमगले काय असे घडले
जे हरवलेले गतजन्मीचे पुन्हा नव्याने गवसले

बीज प्रितीचे तुझ्या अन् माझ्या हळूवार अंकुरले
पहिल्या भेटीत ह्रदयाने ह्र्दयास निमिषात हूंकारले

न आठवे परी वाटले ओळखीचे तुझे सारे काही
डोळ्यात तुझ्या हरवलो होतो माझ्या डोळ्यात तुही

तुझ्या नजरेनं तार छेडली झंकारली प्रित अंतरी
मंद स्मितीत तुझ्या दरवळला गंध चाफ्याचा मंदिरी

सहवासात भासला देह तुळशीचा सात्विक तो अंगणी
स्पर्शात तुझ्या सडा जुई प्राजक्ताचा गेला मजवर बरसूनी

मुखातले शब्द भासले ओळखीचे गतजन्मीचे आश्वासनं
गेले उचंबळूनी अंतःकरण दोन जणू नदी सागराचे मिलनं



शुभांगी सुभाष गायकवाड
shubhgaik@gmail.com