दिलासा.......

Started by SHASHIKANT SHANDILE, August 27, 2020, 02:54:58 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

आलास आज आहे तू थांब ना जरा
बोलून घे मनाचे होऊन बावरा

हो पाळला जरासा मी हट्ट मानते
थकल्या वयात वाटे भेटेल आसरा

भारावली तुझ्यावर माझीच चूक ती
प्रेमात आसवांचा हा लाभला झरा

जखडून बंधनांनी कित्येक राहली
पाहून तृप्त झाली मी आज चेहरा

छडतो तरी किती रे एकांत सारखा
आता जरा दिलासा मज लाभला खरा

✍️गझलकाव्य
शशिकांत शांडिले (एकांत), नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!