तुमच्या आयुष्याचे रंग तुम्हाला काय सांगतात?

Started by swara, August 28, 2020, 07:01:37 PM

Previous topic - Next topic

swara

जर कधी आयुष्याचं चित्र
काढायचा प्रयत्त्न केलास तर
ते अद्वितीय आणि रंगीत बनव,
जे फक्त काळ आणि पांढरं नसेल

काही गोष्टी केशरी रंगाने रंगव 
जो तुला चांगल्या गोष्टीत प्रोत्साहन देईल

काही गोष्टी पिवळ्या रंगाने रंगव
जो तुला आशावादी बनायला शिकवेल

काही गोष्टी लाल रंगाने रंगव
जो तुला तुझी आवड जपायला शिकवेल

काही गोष्टी गुलाबी रंगाने रंगव
जो तुला संवेदनशील बनवेल

काही गोष्टी निळ्या रंगाने रंगव
जो तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवेल 

काही गोष्टी हिरव्या रंगाने रंगव
जो तुझ्या प्रगतीत वाढ करेल

काही गोष्टीं जांभळ्या रंगाने रंगव
जो तुला आध्यात्म शिकवेल

काही गोष्टी तपकिरी रंगाने रंगव
जो तुझ्यात स्थिरता आणायला मदत करेल   

आता राहतात २ रंग - पांढरा आणि काळा,
ज्यांचं अस्तित्व तितकंच महत्वाचं आहे

पांढरा रंग - जो शुद्धतेचं प्रतिक आहे
जो तूझ्यातला गोंधळ स्थिर करून स्पष्टता दर्शवेल

काळा रंग - खर तर हा रंगांचा अभाव दर्शवतो 
पण हा जीवनाचं गूढ समजायला मदतही करतो

मला अजून एक रंगाचं अप्रूप वाटत,

करडा रंग - जो कोणत्याही परिस्तिथीत
तुला तडजोड करायला शिकवेल.

पुन्हा एकदा मी तेच म्हणेन

जर कधी आयुष्याचं चित्र
काढायचा प्रयत्त्न केलास तर
ते अद्वितीय आणि रंगीत बनव,
जे फक्त काळ आणि पांढरं नसेल


(मी जी कविता लिहिली त्यात रंगांचे अर्थं सांगितले आहेत जे आयुष्य घडवतात. मला वाटत माझं आयुष्य या कवितेच्या रंगांनी बनायला हवं. 
आयुष्य कस असायला हवं? यावर तुम्ही काय सांगाल? तुमच्या आयुष्याचे रंग तुम्हाला काय सांगतात?)

                                                                                             - प्राची भोगले