नको रे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, September 01, 2020, 07:38:33 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.नको रे*

आपल्यातील नाते हे असे तोडू नको रे
तुझ्या गाली आसवांचे व्रण खोडू नको रे

मी मागितले नव्हते तुला काही सखे गं
अशी आपल्या प्रेमाची गाठ सोडू नको रे

स्वप्नांच्या महाली आपले घर बांधले गं मी
मला सोडून दुसऱ्याचे नाव जोडू नको रे

अशी का गं गेलीस अर्ध्यावर स्वप्नं रंगवून सारे
आता शांत काळजावर ओरखडे ओढू नको रे

प्रेम फुलांच्या फुलदाण्या सजवल्या कित्येक
त्यांना नशिबाचा दोष देऊन असे फोडू नको रे

आलीस तर शांत बसून सांत्वन कर माझे
खोट्या प्रेमाच्या बढाया तेथे झोडू नको रे

किती सोसले दुःख काय सांगू जगण्यात या
सरणावरची साखर झोप माझी मोडू नको रे

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर