असं कसं हे मरणं-मरणं

Started by Deeksha, September 03, 2020, 01:48:04 PM

Previous topic - Next topic

Deeksha

असं कसं हे मरणं-मरणं
त्याच्याच भितीने ते तिळतिळ जगणं...

संपतो एकदाचा तो प्रवास,अन् तो श्वास
ना राहते मग परतीची आस
उरतात चहुकडे निव्वळ ते भास
निजतो जीव कायमचा, सर्व आटापिटा संपवुन

असं कसं हे मरणं-मरणं
त्याच्याच भितीने ते तिळतिळ जगणं

ना उरते अस्तित्व ना उरते वेदना
प्रसंग तो असतो किती जीवघेना
पण हातात नसते,कुणाच्याच काहीच ना
निघून जावं लागतं एकदिवस,मागे आठवणींच ओझं ते ठेवून...

असं कसं हे मरणं-मरणं
त्याच्याच भितीने ते तिळ-तिळ जगणं...