आयुष्य थोड जगून बघ....

Started by Rushi.VilasRao, September 05, 2020, 06:08:18 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

दाही दिशांला पसरलय दुःख तू खचून जावू नकोस बघ....
दुःख जरी असेल मोठं त्यात कणभर सुख शोधून तर बघ...
जन्म झाला म्हंटल्यावर आयुष्य थोड जगून बघ...
आयुष्याचा राग करून चालेल कस त्याला थोड निरखून बघ....

डाव आयुष्याचा सोपा नाही....
पण सोडून त्याला चालणार नाही....
नुसत स्वप्न पाहून चालेल कस....
त्याला मिळवायला थोड चालून बघ....


संघर्षाला पर्याय नाही वळणा वळणावर कारण देवू नकोस....
झिजल्या शिवाय पर्याय नाही कष्टाच्या वाटेवर चालताना थांबू नकोस....
मिळेल यश नक्कीच तुला त्या यशाची चव चाखून बघ....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)

आयुष्य खूप सुंदर आहे....
तू आयत मिळालंय म्हणून माजू नकोस....
कष्ट करून सजवून त्याला उद्धार त्याझा करून बघ...

जगन जरा कठीण आहे....
मरण थोड सोप्प आहे....
जगण्या मरण्यातल्या अंतरा वरचा प्रवास आहे आयुष्य त्याला थोड जगून बघ....

झाला जन्म माणूस म्हणून तर आयुष्य थोड जगून बघ....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan