आरशाने

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, September 06, 2020, 11:20:08 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.आरशाने*

तुझ्या हसण्यामध्ये प्रेम हे दाखवावे आरशाने
अगं सांग असं कुठे तुला शोधावे आरशाने

निहाळत बसतेस तू जेव्हा स्वतःला आरशात
तुझ्या या सौंदर्याचे गुणगान करावे आरशाने

बघ कधी आलीस तर अंगणात माझ्या येऊन
तेथे तुझ्या चेहऱ्याचे प्रतिबिंब व्हावे आरशाने

आपण भेटणार नाही कधी जग म्हणते सारे
आपल्या प्रेमाचे उत्तर जगास द्यावे आरशाने

आपली भांडणे सात जन्म चालूच राहतील गं
या जन्मातील भांडणे ही मिटवावे आरशाने

किती रुसशील अशी तू गप्प बसून माझ्यावर
असे तुझ्या रुसव्यात का फसवावे आरशाने

अगं मागितले नव्हते तुला देवासमोर कधीचं
केसात माळलेले फुल तेथे पाडावे आरशाने


✍🏻(कविराज अमोल शिंदे पाटील)
मो.९६३७०४०९००.अहमदनगर