नशीबावर् राग आहे...

Started by मोतिदास उके साहिल, September 07, 2020, 10:01:57 AM

Previous topic - Next topic
 तुझ्या विरहाची हृदयात एक आग आहे
तुझ्यावर नाही माझा नशीबावर् राग आहे
अंधाराच्या गर्तेत लोटत पडलाय   
  जीव माझा
विलोमाच्या वजाबाकित               
डाव पडलाय तुझा
संघर्ष,हरणे,जिंकणे जीवनाचा       
  एक भाग आहे
तुझ्यावर नाही माझा नशीबावर् राग आहे
खंगलेल्या हृदयाच्या गाभार्यात   
  अंधार दाटला
जणु तुझ्याच् अवग्रहाने हा         
प्रकाश छाटला
जीवनात तुला जन्मोजन्मी ची     
  जाग आहे
तुझ्यावर नाही माझा नशीबावर् राग आहे.

           मोतिदास उके  'साहिल'

      २६/०८/२०२०