एक व्यथा मुरलेली.......

Started by मोतिदास उके साहिल, September 10, 2020, 06:16:21 PM

Previous topic - Next topic
   एक व्यथा मुरलेली......

कित्येक यशाच्या मागे असते एक कथा हरलेली
जीवनमार्गात् पायाखाली एक व्यथा मुरलेली
थांबलेल्या रस्त्यांवर
अविरत चालने
दुखात रडणे अन्
सुखातही रडणे
रात्र आहे स्वप्नांच्या पुरती, आशेने झुरलेली
जीवनमार्गात् पायाखाली एक व्यथा मुरलेली।
प्रेमाची भाषा प्रेमचं
कसे पटवून द्यावे
बेचव दुःखाच्या पावसात
अगीन पेटवून द्यावे ?
नाती मिळाली पाषाणावर रेघोट्या कोरलेली
जीवनमार्गात् पायाखाली एक व्यथा मुरलेली
कित्येक यशाच्या मागे एक कथा हरलेली.

मोतिदास अ. उके 'साहिल'
१०/०९/२०२०


   एक व्यथा मुरलेली......

कित्येक यशाच्या मागे असते एक कथा हरलेली
जीवनमार्गात् पायाखाली एक व्यथा मुरलेली
थांबलेल्या रस्त्यांवर
अविरत चालने
दुखात रडणे अन्
सुखातही रडणे
रात्र आहे स्वप्नांच्या पुरती, आशेने झुरलेली
जीवनमार्गात् पायाखाली एक व्यथा मुरलेली।
प्रेमाची भाषा प्रेमचं
कसे पटवून द्यावे
बेचव दुःखाच्या पावसात
अगीन पेटवून द्यावे ?
नाती मिळाली पाषाणावर रेघोट्या कोरलेली
जीवनमार्गात् पायाखाली एक व्यथा मुरलेली
कित्येक यशाच्या मागे एक कथा हरलेली.

मोतिदास अ. उके 'साहिल'
१०/०९/२०२०