वाटसरू

Started by शिवाजी सांगळे, September 11, 2020, 12:05:22 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वाटसरू

नसतो भरवसा क्षणाचा
खेळ साराच हा दैवाचा
म्हणू भोग, संचित जगा
समजून ठेवा आनंदाचा

सारेच पराधीन हे इथले
खेळतात खेळ भासाचा
वाट्यास जे भोग आले
कि परतावा प्राक्तनाचा

नश्वर देहाचे लाड करता
विसर पडतो भोवतीचा
मग्न, रत होते ही काया
करूनी विचार भोगाचा

काय खरे न् खोटे अंती
करूनही मोह स्वार्थाचा
ज्ञात असूनही भरकटतो
वाटसरू अज्ञात वाटेचा

©शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९