आई मजा करते

Started by roupika, September 11, 2020, 04:12:57 PM

Previous topic - Next topic

roupika

पाच महिने उलटले
आई मदत मागते
  "अरे ! कुछ तो मदत करोना ।
       कुछ तो मदत करोना  । 
पण शेवटी आईला झाला  CORONA  :o

आता अख्ख घर म्हणतंय  - Go CORONA Go CORONA !!!

बाबा बनले CHEF   
सुपुत्र बनले Assistant
आई देते Instruction Consistent

आता काय !!! आई मजा करते.   ::)

आईला करोनाचा थकवा
बाबाना कामाचा चकवा
आईला मिळते जेवण गरम
बाबा झाले कामांनी नरम     

आता काय !!! आई मजा करते .  :(

आला ताप
लागली धाप
खणाणता फोन
सगळ्यांचा डॉक्टरवाला टोन
Gargle, Steam, औषध, काढे
सगळे सांगतात Same पाढे   

काय मग !!! आई मजा करते ?   :-\

हो  मी स्वतःत रमते ,
स्वतःसोबत  असते
स्वतःसाठी Enjoy करते
Yes !!! मी मजा करते .   ;)


रौपिका देशमुख
मुंबई