जीवना...........

Started by मोतिदास उके साहिल, September 13, 2020, 08:15:32 AM

Previous topic - Next topic
        जीवना............

तु दिलेल्या दुःखाची मनाला खंत नाही

दुःख विसरलो तरी वेदनांना अंत नाही

भोकं पडलेल्या होडीतुन जीवन प्रवास हा

जगवण्यासाठी तुझ् अनर्थक प्रयास हा

वाचवण्यासाठी तुझ श्वासांनाही उसंत नाही

दुःख विसरलो तरी वेदनांना अंत नाही

तुझसाठी तह श्वासांचा प्रवाह हा

जगवण्यासाठी तुझ्, निरर्थक निर्वाह हा

उसने श्वास ही आता हृदयाला पसंत नाही

तु दिलेल्या दुःखाची मनाला खंत नाही

दुःख विसरलो तरी वेदनांना अंत नाही.

       मोतिदास अ.उके  'साहिल'                                               २२/०८/२०२०


        जीवना............

तु दिलेल्या दुःखाची मनाला खंत नाही

दुःख विसरलो तरी वेदनांना अंत नाही

भोकं पडलेल्या होडीतुन जीवन प्रवास हा

जगवण्यासाठी तुझ् अनर्थक प्रयास हा

वाचवण्यासाठी तुझ श्वासांनाही उसंत नाही

दुःख विसरलो तरी वेदनांना अंत नाही

तुझसाठी तह श्वासांचा प्रवाह हा

जगवण्यासाठी तुझ्, निरर्थक निर्वाह हा

उसने श्वास ही आता हृदयाला पसंत नाही

तु दिलेल्या दुःखाची मनाला खंत नाही

दुःख विसरलो तरी वेदनांना अंत नाही.

       मोतिदास अ.उके  'साहिल'                                               २२/०८/२०२०