आज ही बेचैन करतात.....

Started by मोतिदास उके साहिल, September 16, 2020, 06:35:52 AM

Previous topic - Next topic
आजही बेचैन करतात.....

विसरलिस तु पण मी कसा विसरू
तुझ्या आठवणीत ढाळलेले अश्रु
ते अश्रु, त्या आठवणी
                 आजही बेचैन करतात
तुझे ते चोरुन मला पाहणे,
हळूच हसणे,
पाहताच मी,क्षणात लाजणे
ते हसणे-ते लाजणे
                 आजही बेचैन करतात
ती मधूर स्वप्न- चांदण्यांची रातं
रानोमाळ भटकंती घेऊन हातात हातं
आता मात्र आठवणी-विरहाची साथं
त्या चांदण्या-ते स्पर्श
                 आजही बेचैन करतात
आजही स्मृतीत तुझ्या
माझे स्वप्न रडतातं
विरहाच्या या तपातं
मनाची दारं उघडतातं
हा विरह-त्या स्मृती
                  आजही बेचैन करतात.

मोतिदास अ. उके "साहिल"
१६/०९/२०२०

   


आजही बेचैन करतात.....

विसरलिस तु पण मी कसा विसरू
तुझ्या आठवणीत ढाळलेले अश्रु
ते अश्रु, त्या आठवणी
                 आजही बेचैन करतात
तुझे ते चोरुन मला पाहणे,
हळूच हसणे,
पाहताच मी,क्षणात लाजणे
ते हसणे-ते लाजणे
                 आजही बेचैन करतात
ती मधूर स्वप्न- चांदण्यांची रातं
रानोमाळ भटकंती घेऊन हातात हातं
आता मात्र आठवणी-विरहाची साथं
त्या चांदण्या-ते स्पर्श
                 आजही बेचैन करतात
आजही स्मृतीत तुझ्या
माझे स्वप्न रडतातं
विरहाच्या या तपातं
मनाची दारं उघडतातं
हा विरह-त्या स्मृती
                  आजही बेचैन करतात.

मोतिदास अ. उके "साहिल"
१६/०९/२०२०