एक अदम्य इच्छा....

Started by मोतिदास उके साहिल, September 16, 2020, 06:37:54 AM

Previous topic - Next topic
एक अदम्य इच्छा

एक अदम्य इच्छा या हृदयाच्या कोपऱ्यातं
रात्र तुझ्या मिठीत जावी,सकाळच होऊ नये
पुन्हा या संसारसागरी हा जीवच पोहू नये

एक अदम्य इच्छा या हृदयाच्या कोपऱ्यातं
या डोक्याला कुस मिळावी तुझी उशाला
या रात्रींच्या भयानतेची मग भिती कशाला

एक अदम्य इच्छा या हृदयाच्या कोपऱ्यातं
हातात तुझाच हात असावा या जीवन वाटेवरं
नाव कोरले असावे श्वासांच्या प्रत्येक लाटेवरं

एक अदम्य इच्छा या हृदयाच्या कोपऱ्यात
जन्मोजन्मी तुझी ही, अशीच साथ असावी
मी व्हावे दिवा, तु माझी वात असावी.

मोतिदास अ.उके 'साहिल'
१५/०९/२०२०





एक अदम्य इच्छा

एक अदम्य इच्छा या हृदयाच्या कोपऱ्यातं
रात्र तुझ्या मिठीत जावी,सकाळच होऊ नये
पुन्हा या संसारसागरी हा जीवच पोहू नये

एक अदम्य इच्छा या हृदयाच्या कोपऱ्यातं
या डोक्याला कुस मिळावी तुझी उशाला
या रात्रींच्या भयानतेची मग भिती कशाला

एक अदम्य इच्छा या हृदयाच्या कोपऱ्यातं
हातात तुझाच हात असावा या जीवन वाटेवरं
नाव कोरले असावे श्वासांच्या प्रत्येक लाटेवरं

एक अदम्य इच्छा या हृदयाच्या कोपऱ्यात
जन्मोजन्मी तुझी ही, अशीच साथ असावी
मी व्हावे दिवा, तु माझी वात असावी.

मोतिदास अ.उके 'साहिल'
१५/०९/२०२०