माझी माय...

Started by मोतिदास उके साहिल, September 16, 2020, 06:47:49 AM

Previous topic - Next topic
माझी माय......

डोऱ्यातले पानी आटत्, डोऱ्यातच रायले,
जवा गावात सोडून आलो,मी माया मायले।
माले निजवन्यापाई,ती सुखान् नाही निजली,
माझ्या सुखापाई  माई, चंदनापरि झिझली
माले लागु नाही देलन्,पाण्याची झळं,     
माझ्या गरजेपाई झेल्लन, दुःखाची कळं,
तिच्या डोऱ्यातुन, फक्त माझेचं आसू वायले,
गावात सोडून आलो मी,अस्या माया मायले।।
तिनं अर्थ देला माझ्या तोतड्या शब्दायले
त्रासतो मी आता तिच्या सोप्या प्रश्नायले,
हात धरून चालवाले जीनं सिकवले
सरम का?तिला आधार देवून चालवाले,
माझ्या सुखाचे डोऱ्यात तिच्या सपनचं रायले
गावात सोडून आलो,अस्या माया मायले।।।
कष्टानं माईच्या, मति अन् काया सुटातली
शुन्य आईबिना,श्रीमंती अन् शान बूटातली,
जगी तोड नाही  साऊलिच्या कर्तुत्वाले
जगी जोड़ नाही माऊलिच्या मातृत्वाले,
आई असावी जवळ ,घरी नसल जरी खायले
गावात सोडून का यावे? अस्या माया मायले।

                    मोतिदास अ.उके 'साहिल'           दि.५/३/२०२०


   


माझी माय......

डोऱ्यातले पानी आटत्, डोऱ्यातच रायले,
जवा गावात सोडून आलो,मी माया मायले।
माले निजवन्यापाई,ती सुखान् नाही निजली,
माझ्या सुखापाई  माई, चंदनापरि झिझली
माले लागु नाही देलन्,पाण्याची झळं,     
माझ्या गरजेपाई झेल्लन, दुःखाची कळं,
तिच्या डोऱ्यातुन, फक्त माझेचं आसू वायले,
गावात सोडून आलो मी,अस्या माया मायले।।
तिनं अर्थ देला माझ्या तोतड्या शब्दायले
त्रासतो मी आता तिच्या सोप्या प्रश्नायले,
हात धरून चालवाले जीनं सिकवले
सरम का?तिला आधार देवून चालवाले,
माझ्या सुखाचे डोऱ्यात तिच्या सपनचं रायले
गावात सोडून आलो,अस्या माया मायले।।।
कष्टानं माईच्या, मति अन् काया सुटातली
शुन्य आईबिना,श्रीमंती अन् शान बूटातली,
जगी तोड नाही  साऊलिच्या कर्तुत्वाले
जगी जोड़ नाही माऊलिच्या मातृत्वाले,
आई असावी जवळ ,घरी नसल जरी खायले
गावात सोडून का यावे? अस्या माया मायले।

                    मोतिदास अ.उके 'साहिल'           दि.५/३/२०२०