वाट पाहतोय.....

Started by मोतिदास उके साहिल, September 16, 2020, 07:00:35 AM

Previous topic - Next topic
     वाट पाहतोय...

मंतरल्यागत चाललो दिशाहिन
नाही विश्रांती, थकवा ही नाही
कधी संपनार हा प्रवास
वाट पाहतोय

शापलेल्या या जगात
आधारहिन तुझ्याविना
लावावा तुचं थिगळ
फाटलेल्या माझ्या मना
तुचं झाकावा माझा हा कंगालपणा
वाट पाहतोय
   
धड़पडणारे, अंधारलेले जीणे आता नको
मुक्ति दे या शापातुन
वा उध्वस्त करून टाक
आपल्या अस्तित्वात हिरावून
नष्ट होऊन पुन्हा जगण्याची
वाट पहतोय।


     वाट पाहतोय...

मंतरल्यागत चाललो दिशाहिन
नाही विश्रांती, थकवा ही नाही
कधी संपनार हा प्रवास
वाट पाहतोय

शापलेल्या या जगात
आधारहिन तुझ्याविना
लावावा तुचं थिगळ
फाटलेल्या माझ्या मना
तुचं झाकावा माझा हा कंगालपणा
वाट पाहतोय
   
धड़पडणारे, अंधारलेले जीणे आता नको
मुक्ति दे या शापातुन
वा उध्वस्त करून टाक
आपल्या अस्तित्वात हिरावून
नष्ट होऊन पुन्हा जगण्याची
वाट पहतोय।

मोतिदास अ. उके "साहिल"