मनोरा

Started by शिवाजी सांगळे, September 16, 2020, 06:03:38 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मनोरा

नभ येईल भरून...जाईल झाकोळून
अंधार आसमंती...सजेल सावळ घन

दाटता सावल्या...गर्द होईल थेंब थेंब
हळव्या मनी येती...आठवणी स्मरून

सखे,सवंगडी सर्व..थेंबा थेंबात भास
भूतकाळात रमते...चिंब हो तृप्त मन

कसा रे सावरावा..फसव्या वाऱ्यावर
स्वप्नातील मनोरा...जातोय कोसळून

©शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९