स्वप्नांच्या दुनियेतलं खरं होतं नसतं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, September 17, 2020, 07:30:00 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.स्वप्नांच्या दुनियेतलं खरं होतं नसतं*

ती अशीच मिठीत घ्यायची
कावरी बावरी व्हायची
माझ्या मनातलं मात्र ती
ओळखून घ्यायची
तिचं असंच वागणं
माझ्या मनातं चांदण अंथरायचं
अन काळीज पुन्हा नव्याने श्वास भरायचं

आताच कुठे तिनं आपलंसं केलं होतं
तिच्या ओठांवर माझ हसू आलं होतं
आता प्रेमाच्या गप्पा रंगात आल्या होत्या
ती अलगद केसांची बट सावरत होती
मध्येच मनाला आवर घालत होती
आता ती मनानं माझी होऊन
दोन जीव एक होतील असंच वाटायचं
मग मन माझं आभाळ गाठायचं

तिच्या प्रेमाचं गणितं सुटणं
माझ्या सूत्रात कधी बसलं नव्हतं
पण तिचा गोडवा काळजाचे ठाव घेत होता
प्रेमाच्या वळणावर माझी सोबत देत होता
असेच दोन जीवांचे अनेक पावसाळे
काळजावर येऊन जायला लागले होते
डोळ्यात इवलेशे तळे मात्र प्रेमान भरले होते
म्हणून आमचे भेटीचे दिवस असेच सरले होते

दोन प्रेमी खऱ्या रंगात येतील
असंच काही वाटत होतं
पण नियतीला ते ही मंजूर नव्हतं
तिनं माझा हात सोडून
इवलासा संसार मोडला होता
आता जगण्याला अर्थ काही उरला नव्हता
म्हणून श्वासांची मोजणी सुरू झाली होती
मग पुन्हा एका भेटीची मी मागणी केली होती

कधी कधी ती येत असते स्वप्नांत
सजून धजून बऱ्याच वेळा
मी ही वेडा होतो तिला पहात राहतो
तिचं भेटणं कवितेत मांडणं सुरू झालं होतं
तिच्या सौंदर्याला नवं रूप आलं होतं
पण स्वप्नांच्या दुनियेतलं खरं होतं नसतं
असंच काही झालं होतं
तिचं स्वप्नांत येणं स्वप्नांत राहिलं होतं
म्हणून तर तिचं स्वप्नं मी नव्यानं पाहिलं होतं

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर