काळाच्या ओघात

Started by शिवाजी सांगळे, September 18, 2020, 08:54:00 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

काळाच्या ओघात

काळाच्या ओघात..गोष्टी राहून जातात
वयासोबतच काही गोष्टी निघून जातात

होऊन धर्मबिंदू पाणी देहातले पाझरता
क्षण रेतीचे हातामधले निसटून जातात

गाठोडी गवसल्या साठवलेल्या क्षणांची
अडगळीत कायमच वस्त्रे विरुन जातात

आरशा संगती धुरकट त्या भिंतीवरल्या
कवडसे खट्याळ गप्पा मारून जातात

कंपणारे डाव जर्जर देहात भोग उरलेले
सहजच खेळता खेळता थकून जातात

©शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९