जुना माझा देवच बरा विज्ञान नको ग बाई

Started by हिंगे निलेश महर्षीकाशिनाथ, September 19, 2020, 07:03:17 PM

Previous topic - Next topic
 कविता क्र. ४.
🍁 *जुना माझा देवच बरा*
      *विज्ञान नको ग बाई।*🌺

*जुना माझा देवच बरा*
*विज्ञान नको ग बाई।*🌼
  *अति झाली घाई*
*जीवनाला लागली काई।*
*जुना माझा देवच बरा*
*विज्ञान नको ग बाई।*🌺

  *विज्ञान घेऊन जगी*
*आले प्रगति ची वाट*🌼
*वेळ आधी जन्म
*घेतला प्रयोगाचा थाट।*
*जुना माझा देवच बरा*
*विज्ञान नको ग बाई।*🌺

*हायब्रीड झालं जेवण सारं*
*भेसळ झाली सारी*
*प्रगतीच्या नावा खाली प्रत्येकाला घाई।*
*जीवनाची सत्व सारे मरुनिया गेली*
*कच्चे उबवुनी फळ पिकून खाल्ली*
*जुना माझा देवच बरा*🌼
*विज्ञान नको ग बाई।*🌺

*जुना माझा देव*
*त्याला कोळसा फासला*
*नव्या विज्ञानांनी कळसची केला*
*नदी झाली काळी*
*पाणी झाले काळे*🌼
*माणसे झाली काळी*
*नीती झाली काळी*
*धर्म नावा खाली विज्ञान मातला*
*जुना माझा देवच बरा*
*विज्ञान नको ग बाई।*🌺

*जाई तेथ घाई*
*अशी मानवाची जाती*
*पर्यावरणाची त्यांनी केली लवलाई*
*जंगल तोडले मशीनरी अली*
*वन प्राणियांचा दाबूनिया गळा* 🌼
*जीवन साखळीला लवियेला आळा*
*जुना माझा देवच बरा*
*विज्ञान नको ग बाई।*🌺

*विज्ञानाचे नावा खाली*
*आयुष्याची लूट*
*मरण झाले स्वतः*
*इथं पैशाची लूट।*
*डॉक्टर झाला आता यमा वाणी धीट*
*शंभरीचं आयु त्याला भ्याव केलं नीट*🌼
*जुना माझा देवच बरा*
*विज्ञान नको ग बाई।*🌺

             🌺🌼🚩🚩🌹🌷🍁
🌼✍🏻✍🏻✍🏻....
         *लेखक:हिंगे निलेश महर्षिकाशिनाथ*
             🌺🌼🚩🚩🌹🌷🍁