पण वाटलं नव्हतं तु अशी मला विसरशील हात कुण्या दुसऱ्याचा असा तु धरशील.

Started by Dnyaneshwar Musale, September 20, 2020, 03:47:06 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

वाटलं नव्हतं तू मला विसरशिल
हात कुण्या दुसऱ्याच तु असा धरशील

जाता येता सामोरी
तु मला दिसशील
खुद कण गालात तु
आता हसशील
आठवण आली माझी म्हणून
तु एकदा तरी फसशील,


पण वाटलं नव्हतं
तु अशी मला विसरशील
हात कुण्या दुसऱ्याचा
असा तु  धरशील.



भेटी गाठी
तुझ्या मी ही साऱ्या जाईल विसरून,
येता आठवण तुझी
पाणी जाईल डोळ्यावाट घसरून,
आता ठाऊक अंधाराला
फक्त
प्रेमात पडलो होतो मी काल
ओले होईन झाले सारे
पापणीचे ते हाल.
आली आठवण माझी म्हणून
एकदा तरी माघारी वळून तु पाहशील,

पण वाटलं नव्हतं
तु अशी मला विसरशील
हात कुण्या दुसऱ्याचा
असा तु  धरशील.


चिठ्ठ्या आणि  पत्रांचा तो
झाला सारा
खेळ,
लाह्या साऱ्या उडुन गेल्या
आठवणीत राहिली फक्त भेळ,
तुझा माझा  नव्हता कधी मेळ
हरवुन बसलो सारं
आणि एकटी राहिली कातरवेळ.
तरी आली आठवण माझी
म्हणून
एखादं वहीच पान तु पाडशील,


पण वाटलं नव्हतं
तु अशी मला विसरशील
हात कुण्या दुसऱ्याचा
असा तु  धरशील.



झालं गेलं सारं मी आता
थोडं फार सावरून घेईन,,
तु नाही तर दुसरी आता मी पाहीन,
ठेचा बसतात, आणि दुखतातही
म्हणुन थोडा एकटा मी राहील,
मग
आठवण आली माझी म्हणुन
तु एकदा तरी रडशील,
पण बामटे एवढं मोठं पाप
तु कुठं फेडशील.

पण वाटलं नव्हतं
तु अशी मला विसरशील
हात कुण्या दुसऱ्याचा
असा तु  धरशील.