या सत्तेची पाहून रीत....

Started by मोतिदास उके साहिल, September 20, 2020, 04:19:11 PM

Previous topic - Next topic
       या सत्तेची पाहून रीत....

जगन्मित्र जितेंद्रिय ऋषी- मुनींच्या देशातं
लांडगे वावरतात सर्वत्र माणसांच्या वेषातं
पांढऱ्या परिधानातले हे वेताळ सारे
हात कारे कर्मकांडानें, काळिज ही कारे
बनावटी ह्या राजकारणातली ही झोटिंगशाही
रेकत रहावे नुसते, कर्तव्य काही नाही
निर्लज्ज होउनी तोडतात,लोकशाही चे लचके
या सत्तेची पाहून रीत,शब्द ही झाले मुके।

वितंडात विदुष्कांच्या वितळली तरुणाई
वस्त्रहरण लोकशाहीचा,सत्तेच्या हव्यासापायी
गेंड्यांची कातडी ओढलेले लचांडखोरं
खुलेआम लूटतात देशाला हे महाचोरं
कांड- घोटाळे ऐकून,छातीचे चूकतात ठोके
अन्यायाचे, षडयंत्राचे गड़द झाले धुके
या सत्तेची पाहून रीत,शब्द ही झाले मुके||

मोतिदास अ. उके 'साहिल'
२०/०९/२०२०