विरघळणारी मिठी

Started by Rupesh Naik, September 23, 2020, 11:53:27 AM

Previous topic - Next topic

Rupesh Naik

विरघळणारी मिठी

------रुपेश नाईक


का कुणास ठाऊक त्या मिठीमध्ये एक अनपेक्षित ओढ होती
तन गुरफटले तरी मनाच्या कोड्याची सोड होती .....

ती अलगद मिठीत येता कस्तुरीचे  सुगंध दरवळले होते
मनाच्या शिदोरीचे ओझे प्रेमाच्या सागरात विरघळले होते .....

अस्तित्व ठाव देह विचारांचा थांगपत्ता राहिला  नव्हता
पहिल्यांदाच चंद्राच्या टपोर चांदण्यात सूर्यास्त मी पहिला होता ....

भावनांचे बांध फुटून ते अनबंध वाहत होते
या गदारोळात तिचे कान मात्र हृदयाचे ठोके मोजत होते .....

स्वेटरला मत्सर व्हावा अशी ऊब त्यात सामावली होती
कापऱ्या हाताने कुरवाळता एक शिरशिरी तनात दणाणली होती .....

भानावर येता  सारे अगतिक पुन्हा जाहले
निरोपाची चाहूल लागता सारे सुन्न होऊन गेले .....

मन जड  डोके जड  निरोपाचे पाऊल देखील जड
विचारांच्या घेऱ्यात प्रश्न " पुन्हा मिळेल का हि सवड ?"

.....

पुन्हा मात्र मिठीत येत मी  स्वछंद डोळे मिटले
हरवत जाता चंद्र माझा दुजेपणाचे भान सुटले ........

पुन्हा एकदा मिठीत येता मन मनात विरून गेले
आयुष्याचे सोनेरी युग दोन क्षणात जगून गेले...
आयुष्याचे सोनेरी युग दोन क्षणात जगून गेले...


शब्द उरले नाहीत, स्पर्शातच अर्थ ठसठसत राहिला
त्या मिठीतला शेवट हसरा... आणि डोळा मात्र पाणावला
प्रेम संपत नाही रे, ते क्षणात विरघळतं...
जगण्याच्या प्रत्येक वळणावर, मिठी साऱ्याला भिडतं...

Rupesh Naik