लोक म्हणाले, बोलण्यात चुकला

Started by Medha Jawale, September 25, 2020, 03:36:13 PM

Previous topic - Next topic

Medha Jawale

उच्चारले नाहीत हवे ते शब्द
अपूर्णच राहिली इच्छा सुप्त
गडबडलास,अडखळलास
लोक म्हणाले, बोलण्यात चुकला...

डोक्यात एक, कागदावर एक
हातातला पेनही थरथरला
नाईलाजाने शब्द तो खोडला
लोक म्हणाले,लिहिण्यात चुकला...

होते मनात, वागलास भलताच
क्षण आला तो गमावला
आता हुरहूर ती मनाला
लोक म्हणाले, वागण्यात चुकला...

होतास तू निर्भीड ,सक्षम
एक क्षण तू हेलावला
शरण गेला परिस्थितीला
लोक म्हणाले, जबाबदारी घेण्यात चुकला...

असा कसा लागतो चकवा
आणि धरतो रस्ता फसवा
गमावतो सारेच मी मित्रा
लोक म्हणतात, देवच कोपला..

     सौ.मेधा जावळे,चिंचवड,पुणे
                        ९५०३२८८८४४