सल

Started by शिवाजी सांगळे, September 29, 2020, 10:26:35 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सल

गमवण्याचे दु:ख...नसते कधी कधी
फसवण्याचे दु:ख..सलते कधी कधी

इच्छा मनीची व्हावे आवर्तन सुखाचे
येता विचार, सुख..वळते कधी कधी

सुख दु:ख नित्य..वहिवाट जीवनाची
वेदनेतले ते जगणे छळते कधी कधी

भोग परस्परांचे..कोणास का कळावे
वाट्यात प्रत्येका...मिळते कधी कधी

अतर्क्य अंदाज हे..सारेच चाचपडणे
हुलकावणारे सत्य..पळते कधी कधी

©शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९