*** आभास हा.... ***

Started by धनराज होवाळ, October 04, 2020, 06:58:41 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


🥰 आभास हा... 🥰

या पहाटेच्या धुक्यामध्ये,
सखे तुझं प्रतिबिंब दिसावं..
यावा आठवणींचा पाऊस,
अन् त्यात तु गोड हसावं..!!

प्रेम पाऊस हा असतोच,
प्रेमात चिंब भिजवणारा..
तु हात पसरू पाहिल्यावर,
तो मनसोक्त बरसणारा..!!

मग येते झुळूक वाऱ्याची,
ती हवीहवीशी वाटणारी..
अन् सोबतीस गुलाबी थंडी,
अंगावर शहारे दाटणारी..!!

मग हृदय शोधतं तुला,
जिकडे तिकडे खुप खूब..
कारण त्याला हवी असते,
ती तुझ्या प्रेमाची ऊब..!!

तुझ्या मिठीत विसावल्यावर,
सखे मला स्वर्गभास होतो...
पाऊस थांबल्यावर मात्र,
मग पुन्हा हा आभास होतो...!!!
-
🤴🏻 प्रेमवेडा राजकुमार 🤴🏻
( ©धनराज होवाळ )
मो. ९९७०६७९९४९.