चाकोरी

Started by NARAYAN MAHALE KHAROLA, October 12, 2020, 12:04:05 PM

Previous topic - Next topic

NARAYAN MAHALE KHAROLA

कुपमंडुक

प्रत्येक पिकाला ओळ असते,
त्यातही कुठेकुठे घोळ असते।
छोट्या छोट्या चुका शोधून,
त्यांना घो म्हणायचं असत।
आपल्यात असत वेगळं काही,
तेच आपण बनायचं असतं।

दुसऱ्यांच्या कल्पनेला,
खूप साऱ्या पुष्ट्या असतात।
त्यातून फक्त शिकायचं,
करण त्या उष्ट्या असतात।

कुणीतरी घडवलेले
आपण नेहमी शिकत आलो।
फायद्यापुरते रट्टाडुन,
स्पर्धेत कसे टिकत आलो।
चाकोरीतून आलेले,
हुकमाचे दास असतात,
चाकोरीला भेदून गेले,
तेच मात्र खास असतात।

केवळ विवेकबुद्धीचाच
खेळ हा सारा असतो।
अवकाशातून जाणारा,
तुटलेला तारा असतो।
आपण पास झालो,
गुलामीतले दास झालो।

आता आपल्या पिल्लांना
हेच तर सांगायचं आहे।
कुपमांडुक प्रवृत्तीला,
वेशीवर नेऊन टांगायचं आहे।