कधी खचून जाऊ नकोस

Started by Ram Deshmukh, October 14, 2020, 06:17:37 PM

Previous topic - Next topic

Ram Deshmukh

सकारात्मकते च्या पारंबिला तू घट्ट पकड
नैराश्याच्या दलदलीतून पुन्हा पाय वर येईल
आशेच्या पावसात कधी भिजून तर बघ
मनाचे दुःख सारे पाण्याने वाहून जाईल

पुस्तकांची जवळीक तू पक्की मैत्री पकड
अज्ञानाची सारी कीलमिषे मिटून जाईल
भयाण रात्र, काळोख जरी सभोवती
धैर्याचा दिवा पेटवून ती वेळही बघ निघून जाईल

स्वप्नांच्या प्रदेशात स्वतः ला थोडा विस्मरून सोड
निखाऱ्यावर पावलांना तो थोडा गारवा देऊन जाईल
भावनांचा स्पर्श नको, कर्तव्याची साथ पकड
कर्तुत्व सिद्ध करुनी, आसित्व सर्वांना बघ समजून जाईल

प्रकाशाच्या वाटेवर गरजूंचा तू हात पकड
अज्ञानाचे चढवलेले अनेक चेहऱ्यावरील मुखवटे,
तुझ्या मंत्रमुग्ध विचारांनी बघ उतरून जाईल.
अंतर्मनाच्या आगीला पेटवण्याचे मर्म सांग
सूर्याप्रमाणे प्रत्येकाच्या आंतरिक तेजाने बघ
सारे ब्रह्मांड कसे उजळून जाईल.

©✍️ राम देशमुख (परभणी)