राखेतून उठून अस्तित्व निर्माण करेन

Started by Ram Deshmukh, October 14, 2020, 06:25:22 PM

Previous topic - Next topic

Ram Deshmukh

राखेतून उठून ही अस्तित्व निर्माण
करण्याची उर्मी अजून देहात संचारत आहे.
पावलांना पडलेल्या जखमांच्या सुगंधाने
वाटा अजूनही प्रफुल्लित झालेल्या दिसत आहे.

आकाशाची उंची गाठण्याची जिद्द असली जरीही मात्र
पाऊल जमिनीवर ठेवण्याचा मोह अजून रक्तात आहे.
तिरस्कारी नाजरांना आपलंसं करण्याची
ताकद माझ्या स्मित हास्यात आहे.

मार्गस्थ असताना अपयशाची चिंता
माझ्या मनाला बांधू शकणार नाही.
ध्रुव प्रमाणे अढळ पद मिळवण्याच्या जिद्दीने पेटलेला
माझा देह ते पद मिळे पर्यंत मी विझू देणार नाही.

दुःखाचे सोहळे साजरे केले इतकी वर्ष,
आता आसवांना वाहण्याची मुभा असणार नाही.
वादळाने हेलकावे घेणारी आयुष्याची नौका मी
मनाच्या संयमाने संथ करून हळू हळू पुढे नेणार आहे.

गमावलेल्या गोष्टींची चिंता न करता, येणाऱ्या प्रत्येक
क्षणांचा मला कर्तुत्वाने आयुष्याला हिशोब द्यायचा आहे.
शब्द सुमानांसाठी नाही, शाबासकी साठी नाही,
मला फक्त माझा आज बदलायचा आहे.
या धावपळीत मला माझ्यातला मी जपायचा आहे

शेवटच्या श्वास पर्यंत मी माझे पात्र अशा एका उंचीवर
नेऊन ठेवेल की, प्रत्येक पाहणाऱ्या नजरेला त्याचा सार्थ  अभिमान वाटावा.

©✍️ राम देशमुख (परभणी)