असचं येता-जाता

Started by vpbarde, October 21, 2020, 12:11:47 PM

Previous topic - Next topic

vpbarde

     खुप दिवसांपासुन माझ्या मनात ना एक सुंदर प्रेमकथा लिहिण्याचा विचार आहे. पण नाही जमलं.. आणि आजची परिस्थितीच वेगळी आहे. आज चारी बाजुनी माणसाला वेगवेगळया अडी-अडचणींनी घेरलयं.. दिवसें-दिवस जगण्यासाठीचा संघर्ष अवघड होतोय.. पण हे दिवस ही जातील आणि सगळं सुरळित सुरु होईल असा आशावादही प्रत्येकाच्या मनात आहेच.. असो... एक निरागस-अल्लड प्रेमकथा लिहिण्याचे माझे स्वप्नही पुर्ण होईल.. सध्या मात्र माझी आणि प्रत्येकाची कथा-व्यथा एकच.. करोना..     पण छोटया-मोठया संकटांना घाबरणारी मानव जात नक्कीच नाही.. 
     सध्या राजकारणात आणि बॉलिवुड मध्ये किती आणि काय-काय सावळा गोंधळ चालु आहे.. माझ्यातर आकलनाच्या बाहेर चाललयं.. पण एव्हढं मात्र नक्की कि आज सगळी जणच बावरुन गेलेली आहेत.. स्व:ताच्या अस्तित्वाबदल सांशक झालेली आहेत... गरज आहे खंबिर आधाराची.. मानसिक आणि भावनिक आधाराकरिता माणुस नेहमीच आसुसलेला असतो... म्हणुनच मानसशास्त्र विषय घेवुन एम.ए  करण्याचं अनेक स्वप्नांपैकी माझं एक स्वप्न होतं. कदाचित पी.एच.डी सुदधा.. चला हा कठिण काळही माणसाची एक वेगळी ओळख करुन देईल. माणसाच्या ताकदीचे आणि त्याच्या इच्छाशक्तीचे वेगळे रुप दाखवेल.. या गप्पानां अंत नाही.. महत्वाचे आहे ते आजच्या परिस्थितीतुन सावरणे आणि यातनं धडा घेणे..
      दिल बेचारा नंतर कोणतीच नवी मुव्ही बघण्यात नाही आली.. शकुंतला देवी या महान गणितज्ञ वर असणारी मुव्ही चांगली आहे.. वेगळी आहे.. पण आमच्या सारख्या बेहिशोबी कारोबार असणा-यांच्या हिशोबात ही शकुंतला देवी नाही रुचत.. असो.. चला आता खेळण्यांची दुकान चालु झाली आहेत.. माझ्या छोटया दोस्तासाठी एक छानशी खेळणी घेण्याचे ठरविले आहे.. पर यार आज इंन्सान भी खिलौना बनकर रह गया है.. क्या करे.. गलती इंन्सान की ही तो है.. चाबी लगे खिलौने की तरह दौड जो रहा था..
      मध्यंतरी मी Half Chocolate ही Short Movie बघितली.. This Movie is about A Short Temper Police Inspector and Innocent College going Girl.. Police gets Emotional When he Meets that College going Girl. This College going Girl is so Innocent that she take Chocolate from Police Inspector and eats half Chocolate.. She tales her tragic story to that Short Temper Police Inspector and the whole psychology of that Short Temper Policemen is changed.. 
        मानवी मनाचे अनेक कंगोरे असतात.. वाचन.. लिखाण.. रोज भेटणा-या व्यक्ती.. वेगवेगळया मुव्हीज.. आणि या सगळयांकडे बघण्याचा आपला असा एक दृष्टिकोण.. अश्या अनेक गोष्टींमुळे आपल्याला मानवी मनाच्या वेगवेगळया पैलुंची ओळख होते.. काही वेळेस आपल्याला खरोखर मनाला थक्क करणारा अनुभव येतो.. Half Chocolate मधल्या त्या मुलीची निरागसता बघुन मी क्षणभर बैचेन झाले.. मला त्या मुलीची भिती वाटली.. तिचा अल्लडपणा आणि भोळेपणा घातक वाटला.. आणि त्या पोलिस इंन्पेक्टर बदल सहानुभुती वाटली.. या Half Chocolate मध्ये कमीत-कमी वेळात जास्तीस जास्त सांगण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
      या दुनियादारीचा भुलभुलैया समजुन घेताना कधी-कधी आपण हरवुन जातो आणि वाटत कि...     

अभी तो सफर बहोत लंबा है..
बहोत सी कहानियां सुनना और सुनाना बाकी है ..
पर रास्ते मे ही सो मत जाना ..
                  यहॉ कदम-कदम पर कांटे बिखरे है.. संभलना जरुरी है..