paus aani me

Started by ajay81, October 24, 2020, 09:27:16 PM

Previous topic - Next topic

ajay81

भर दुपारी ग्यालरीत
निवांत उभा होतो
बरसणारा पाऊस
एकटक पाहत होतो

बरसताना तो ही
माझ्याकडेच बघत होता
"झुरताय वाटत अजून? "
म्हणत फिदीफिदी हसत होता

भानावर येऊन मी ऊत्तर दिले त्याला
"भाऊ मी कशाला झुरू?
संसार माझा सुखाचा
केव्हाच झालाय सुरू
झुरणारे झुरतील
कुढणारे कुढतील
जमाना बदल गया प्यारे
त्यांची ते झक मारतील"
             
डोळे मिचकावत मी
त्याला टाळीसाठी हात पुढे केला
गडगडाटी हास्यात
तो जोमाने बरसू लागला

                  ...............Ajay shere ;D