माझ मनं

Started by Raj9277, November 08, 2020, 03:09:47 PM

Previous topic - Next topic

Raj9277

  ....अंधार...
रात्रीचा अंधार मला हवाहवासा वाटतो,
कारण माझ्या एकटेपणात तोच सोबत असतो...
माझ्या मनातील अनेक गोष्टींच गुढ तो उकलतो,
अंधारात स्वतःशीच बोलतांना मीच मला कळतो...
खुपदा कुणाशी बोलू शकत नाही म्हणुन त्याच्याशीच मी बोलतो, 
तोही मला समजून घेतो, मोकळेपणाने सांगतो...
माझी सोबत घटकाभर आहे, कारण प्रकाशाने मी भंगतो,
त्या प्रकाशाची आस धर, तोच जीवन रंगतो...
नवी आशा, नवी उमेद ठेऊन तु जग हे सांगतो,
सोबत माझ दुःख नेतो, आणि हळूहळू तो पांगतो..... हळूहळू  तो पांगतो....

RAJA B