आधिच कळून जायचं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, November 10, 2020, 05:38:10 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.आधिच कळून जायचं*

आधिच कळून जायचं
मन पाखरू होणार
अन हृदयाची धडधड
चाहूल द्यायची ती येणार

वारा सुसाट व्हायचा
उंच उंच झेपा घ्यायचा
कोमल कळीला स्पर्शरुपी
नकळत जवळ घेऊन यायचा

कविता मुक्त व्हायच्या
शब्द तयारीला लागायचे
आज न उद्या तिच्यासाठी
एकमेकांसोबत घट्ट व्हायचे

आता येईलच ती म्हणून
दिव्याला वाती सोबत द्यायच्या
पुन्हा अंधार होईल म्हणून
उजेडासाठी झिजून जायच्या

लेखणी सुरुवात करायची
स्वप्न नव्याने पुन्हा भरायची
तिच्या नजरेची अदाकारी
मग एक ओळ होऊन यायची

मग एक पान दोन पान
तिच्या कविता रंगात यायच्या
पापणी लवती तोच साऱ्या
धोका देऊन लुप्त व्हायच्या

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगरजायचं