बोल जरासं तू

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, November 12, 2020, 10:50:56 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.बोल जरासं तू*

बोल जरासं तू ही आज
शांत अस बसू नकोस
देह जरी गेला वैकुंठाला
आत्म्याला तरसू नकोस

थडगे असेल माझे जिथे
सुंदर रांगोळीने सजवून दे
धूळखात पडलो असेल मी
आसवांत मला भिजवून दे

एक दिवा तिथे असेल बघ
वाट बघत निपचित पडलेला
प्रेमरुपी वातीला कवेत घेण्या
खूप दिवसापासून दडलेला

पाऊल खुणा शोधू नको
त्या ही विसरल्या असतील
सडा टाकला आहे कोणी तरी
म्हणून मातीत जिरल्या असतील

आता दिसली आहेस तू म्हणून
वेळ ही मागे लागणार आहे
कर माझी ही मुक्तता आता तू
हेच मागणे तो मागणार आहे

बघ किती दिवस लावलेस तू
तिथे आल्यावर कळणार गं
आत्मा तरसत होता किती
तुला पाहूनचं तो ढळणार गं

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर