दिवाळी

Started by kkomal, November 12, 2020, 07:12:36 PM

Previous topic - Next topic

kkomal

नवे दीप नवी आशा ,उजळू दे सारेच आता
नको कोणते घर अंधारात ,नको कोणी कोरोनाचा दारात
लख्ख रस्ते लख्ख घरे, दुख्ख  सारे  त्यात विरे
प्रेमरुपी रंग  आज उधळती चहूकडे.

शोभते आकाश कंदील ,टांगले उंचावरी
टाकला सडा रांगोळी ,तोरणही साजते  दारी
होई अभंग्यस्नान, लावूनी उटणे सुगंधी
बोचऱ्या गुलाबी थंडी ची वेगळीच आहे धूंदी
गोड खाऱ्या फराळाने वाढवली सणाची गोडी
बालकांची घाई फार पेटवण्या फटाक्यांची लडी

शुभशकुनी सोनकिरणे  ,नाश करुनी दानवांचा
लक्ष्मी वास करते आज प्रत्येक घरी
देवा अंधारावर मात करुनि उजळू दे सारेच आता
चहूकडे सुख असुदे हीच या दिवाळी ला आशा
भुकेले भोवताली असतील किती
वाटा आनंद सर्वाना हीच माझी विनंती
                                         kk