दिलाची राणी...

Started by गणेश म. तायडे, November 26, 2020, 11:46:19 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

तुझ्या ओठांवर लाली
खळी येई तुझ्या गाली
चंद्र जणू पीरतीचा
आहे माझ्या आसमानी

रूप देखणे लावण्य
जणू अप्सरा दिलाची
मृगनयनांची जोडी
जणू चंद्राच्या ह्या कोरी

बोल तुझे मोत्यापरी
शिंपडीत जाई कानी
तीळ शोभे हनुवटी
जीव कासावीस होई

चाले मोराची तू चाल
रुनुझुनू तालावरी
पैंजणे वाजे पायी
धडधड उरी होई

तुझी प्रेमाची ती हाक
ऐकण्या आसुसला प्राण
पाहुनिया तुझे रूप
मिटे दिलाची तहान

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11