झुरळ

Started by harish.deshmukh86, November 27, 2020, 09:22:54 AM

Previous topic - Next topic

harish.deshmukh86

नारळाचे झाड मोठे  सावली विरळ आहे!
सोड वेड्या नाद माझा  मी साधी सरळ आहे!!
ना पाहिले वळून मी,ना हसले अजूनी आहे!
समजाव तुझ्या वेड्या मनाला, ही फसवी भुरळ आहे!!

ती गोड घडी हातांची वही पेन जिथे ग वसतो!
स्वप्नात बावरा मी वही पेन तुझा ग असतो!!

तूच माझी प्राणवायू,अन मी तुझा मरळ आहे!
तूच माझी कन्याकुमारी   अन मी तुझा केरळ आहे!!

मज  वाटते हुन बोलावे मज वाटते हसूनी वळावे
पण वाटले मला तू,नजरेतुनी कळावे
जरी असले साधी  सरळ मी,ह्रदय माझे तरळ आहे..
मी तुझी लेणी अजिंठा तू माझा वेरूळ आहे
मी फक्त तुझी रे वेड्या जरी मी साधी सरळ आहे
बोललीस तू इतके,मज काळीज भरून आले
जे मागशील त देईन , मी वचन आज  हे दिले
मागशील जरी मुंडके माझे देईल स्वखुशीने
प्रेमात तुझ्या वेडा मी ,एक छोटा झुरळ आहे.

एक छोटा झुरळ आहे.