आताशा फक्त

Started by swapnil.jadhav@dy.co.kr, November 30, 2020, 09:54:03 AM

Previous topic - Next topic

swapnil.jadhav@dy.co.kr

आताशा  फक्त अश्रूंचा हा ओला दुष्काळ असेल
फक्त तू नसशील तुझी आठवण कायमच असेल

मी प्रत्येक समयी माझे स्मित हास्य जपत राहील
तुझं अनभिषिक्त प्रेम जर माझ्या नशिबात असेल

उजेडाला तुझ्या नयनात  खूप जतन करून ठेव
आता दूर पर्यंत फक्त संध्या आणि रात्र च असेल

उदासवाणी असशील तू अन बेचिराख असेल मी
आता मधुशाळेत फ़क्त, फक्त हाच विषय असेल

तुला मी तिथे भेटेल जिथे सूर्य अंधकारमय होईल
तुझ्या सवे तिमिरातून नवा प्रकाश उगवत असेल

वाटसरू आहेस तू आणि आहोत आपण वाटसरू
कुठल्या तरी एका क्षणाला भेट तुझी पुन्हा असेल

तुझी अन माझी घडेल  भेट केव्हा तरी कुठे तरी
त्या प्रहरी मौनाला मौनाची भाषा कळाली असेल
-Swapnil Jadhav