मी तुझ्या समीप राहतो

Started by indradhanu, March 08, 2010, 12:44:17 AM

Previous topic - Next topic

indradhanu

मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
दूर जरी तू तिथे हितगुज मी साधतो
अंतरीची ओळख सखी पाउल इथे रेंगाळते
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तू तिथे तृप्तीचे श्वास घ्यावेत
अन त्या श्वासांनीही इथे मी तृप्त व्हावे
आयुष्याची वाटचाल एकटयानेच चालायची असते
हा विचार करायलाही मला सोबत तुझी हवी असते
आपले कुणीतरी असावे थोडेसे गालात हसणारे
रडल्यावरही रागावणारे आणि नकळत डोळे पुसणारे
तुझे आश्वासक डोळे खूप दिलासा देऊन जातात
तुझ्या पाउलवाटेवरहि मी तुझा सोबती आहे
हे खरे खरे सांगून जातात........

shinde.samir

तू तिथे तृप्तीचे श्वास घ्यावेत
अन त्या श्वासांनीही इथे मी तृप्त व्हावे
Nice one...............

PRASAD NADKARNI