" भीमराया " 🌷🙏

Started by Ashok_rokade24, December 06, 2020, 06:15:13 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

भीमराया तुझ्या जाण्याने ,
सुकाळ गिधाडांचा झाला ,
जो निर्भिड  केला समाज ,
पुन्हा पोरकाआता झाला  ॥

कैक शिकून झाले मोठे ,
परि गटा तटात रमले ,
संघर्ष हा कमजोर झाला ,
अन्यायाचा भाव वधारला ॥ 

वस्ती पाहून हल्ला होई ,
मुर्ती कुठे विटंबित होई ,
अब्रू कुठे कलंकित होते ,
न्याया साठी समाज झुरला ॥   

वेळ आता संघर्षाची आहे ,
गरज आता चित्यांची आहे ,
न्थाया साठी हवी एकता ,
श्रध्दांजली ही भीमरायाला ॥

माणूसपण दिले भीमाने ,
मार्ग बुध्दांचा दिला भीमाने ,
ऊरी भीमाची ठेऊ शिकवण ,
बळ एकीचे मिळो सर्वांना ॥

जिथे जळाली बाबांची चीता,
रक्षा तेथील भाळी मिरविता,
जाणीव रहाते मनी सर्वदा  ,
भीमराया आहे नित साथीला ॥

अशोक मु.रोकडे. /मुंबई.
06/12/2020.