हे माणसा तू हारलास

Started by pjain1910, December 08, 2020, 12:12:58 PM

Previous topic - Next topic

pjain1910

            हे माणसा तू हारलास
हे माणसा तू चुकलास
चुकीच्या माणसाकडून गरजेपेक्षा जास्त अपेक्षा केलास
हे माणसा तू हारलास
स्वत:च्या सुखासाठी मनाच्या आहारी गेलास
हे माणसा तू चुकलास
दुसऱ्याच्या हितासाठी मनाचा त्याग केलास
हे माणसा तू नजरेतून उतरलास
ज्याचा तुझ्यावर जास्त विश्वास होता त्याचाच तू घात केलास
हे माणसा तू सर्वकाही गमावलास
तुला माहित होते मन तुझे आहे त्या मनाला ही त्रास देऊन तू मारलास
हे माणसा तू अपेक्षाहीन झालास
ज्याने तुझ्याकडे अपेक्षा केली त्याची अपेक्षा भंग केलास
हे माणसा तू विसरलास
जगाचा विचार करून तू स्वतः च्या मनाला विसरलास
हे माणसा तू हारलास
प्रेमाच्या विश्वात तू हारलास
तुझ्या प्रेमाला तू स्वतः च हरवलास
हे माणसा तू लाचार झालास
तुझ्याकडे जे होते ते सर्व तू गमावलास
लढाई जिंकायच्या आधीच तू माघार घेतलास