प्रेमाची रीतं.....

Started by मोतिदास उके साहिल, December 11, 2020, 09:52:36 PM

Previous topic - Next topic
प्रेमाची रीतं.....

अजब आंधळ्या प्रेमाची रीतं
अश्रुत बुडालेल्या स्वप्नांची प्रितं             
जिव्हारी दुराव्यांचे घाव
अन् निरंतर वेदनांचे स्त्राव
करपलेल्या भावनांचे तप्त रान
अन् आसवांनी न क्षमणारी तहान
अस्मितेवरचे अनैच्छिक ग्रहण
अन् संपलेल्या कल्पनांचे भ्रमण
श्रापलेले जीवनकथेचे अधुरे गितं
असी अजब आंधळ्या प्रेमाची रीतं.

मोतिदास अ. उके "साहील"
११/१२/२०२०