अबोला

Started by Anil S.Raut, December 18, 2020, 06:02:20 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

हा एकटेपणा बरा नव्हे
उगीच दुरावा बरा नव्हे

काहीही बोल पण बोल
असा अबोला बरा नव्हे

काय झाले ते तरी सांग
घोर काळजाला बरा नव्हे

झुरते तू ही,झुरतो मी ही
क्लेश आत्म्याला बरा नव्हे

मरणे कणाकणाने नशिबी
हा रोग प्रेमाचा बरा नव्हे..!

            © अनिल एस.राऊत
                 8999689957