आठवण

Started by Aadi Shinde, December 20, 2020, 09:07:55 PM

Previous topic - Next topic

Aadi Shinde

आठवण तिची.......
अस कधी होत का आपल्या जी व्यक्ती आवडते तिची कधी आठवणच येत नाही...?
मला ही तसच ती रोज आठवते पण आता ती कधी भेटलं माहित नाही...?
पण मात्र तिची आठवण हमेशा माझ्या सोबत असते भेटली होतीस ती एक दा खूप हसवलं आणि शेवटी रडवल ही
पण म्हणतात ना प्रेम आंधळ असत त्या व्यक्ती कडून कितीही चुका झाल्या तरी आपण माफ करतोच
रोज भेटावसं वाटत ग तुला
रोज तुझ्या शी बोलावंसं वाटत
रोज तुझ्या सोबत फिरवास वाटत
रोज तुझ्या शी मस्ती घाला वाटते
रोज तुझ्या शी भांडवस वाटत
आणि कधी कधी तर
तुझ्या गळ्यात पडून खूप रडावसं ही वाटतं
कारण हे कधी होणार नाही माहित आहे पण जे पुर्ण्य होणार ही नाही आपण त्याची च का स्वप्न बघतो काय माहित
तुझी आठवण ही खूप रडवतेस ग मला आली की डोळ्यातलं पाणी घेऊन घेल्या शिवाय राहत नाही
स्वतःला खूप सावरतो आणि मनाला ही खूप समजावते पण तुझी आठवण आली की सगळं बेचैन होत जीव लागत नाही काई नई
माहित नाही अस का होत पण मन हमेशा तुझ्या आठवणीत धुंद असतं
तू भेट नाही तर नको भेटू भेटुस तुझी आठवण रोज भेटते मला रोज भेटते मला...
By Aadi Shinde

ankushlatkar

 खुप छान Keep It Up 👍👍