जर भेटल एखाद्या वळणावर कोणी...

Started by Rushi.VilasRao, January 01, 2021, 11:17:29 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

जर भेटल एखाद्या वळणावर कोणी....
रंगतील थोड्या गप्पा नक्की....
लक्षात रहात नाही मी सहसा कोणाच्या त्यामुळे
विचारत नाही अस मला कोणी....
पण बोलता बोलता विचारलंच तुला कोणी...
कोण आहे तो....
सांगू वाटल तुला सांग त्यांना नक्की...
"खास नाही कोणी तो पण आहे फक्त ओळख,
झालेली ओळख अशीच एका वळणावर,
चाललो मोजून दोन पाऊल सोबत,
मारल्या चार गप्पा,
निघाले विषय इकडचे तिकडचे पण मारल्या नाहीत थापा...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
केला थोडा हसी मजाक,
चालता चालता एकटच गेला जरा वेळ...
का कोणास ठावूक वाटल माझच मला तो वाढवतोय जरा ओळख...
त्याला वाईट वाटू नये म्हणून मी ही बोलले नाही काही....
रस माझा दिसत नाही म्हणल्या वर त्यांनी ही बदलला विषय...
कळल असावं त्याला टाळला मी त्याला...
विषय त्याने ही रंगवला नाही...
मी ही नाही गेले खोलात...
रस्ता जेमतेम संपतच आला...
वेळ माझा ही थोडा चांगला गेला...
संपतच आला प्रवास...
आता संपतच आल वळण...
वळण संपल भेट संपली....
पुन्हा भेट व्हावी अस वाटल नाही...
एवढीच काय ती ओळख....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan